
प्रतिनिधी: BMTमराठी पुणे
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे.इंदापुर तालुक्यातील निमसाखर येथील मुख्य राजवाडा – बाजार तळ निमसाखर येथे दर वर्षी तीन दिवस शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो.यामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा तसेच आरोग्य व रक्तदान शिबीर यासह अनेक सामाजिक उपक्रम शिवजन्मोत्सवा निमित्त शिवजन्मोत्सव समिती निमसाखर यांच्या कडून राबविण्यात येतात.

शिवजन्मोत्सवा निमित्त दिनांक १७ फेब्रुवारी रोजी अकलूज येथील सुप्रसिध्द डॉ.एम.के इनामदार यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन करुन पुष्पहार घालून शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली असून डॉ.इनामदार यांच्या हस्ते आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे उद्घाटन करुन आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराला प्रारंभ करण्यात आला.तर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनसाठी चित्रकला स्पर्धा, महिला व मुलींनसाठी रांगोळी स्पर्धा तसेच संध्याकाळी ७ वाजता हिप्नाॅटिझम (संमोहन) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तर शिवजयंती दिवशी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता शिव प्रतिमेचे पूजन करुन सकाळी ८ वाजता विद्यार्थी, ग्रामस्थ व शिवभक्तांच्या समवेत निमसाखर मधील मुख्य राजवाडा बाजार तळ येथुन शिवमुर्तीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर मिरवणुकी नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे स्नेह भोजन होणार आहे.