नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात नुकसान भरपाई मागण्याची तरतूद:ॲड. विशाल बर्गे

Spread the love

प्रतिनिधी: BMT मराठी बारामती

नवीन ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाली तरी आता ग्राहक मंचाकडे तक्रार करता येईल. तसेच ज्या ठिकाणी तक्रारदार राहतो तेथेही तो तक्रार देऊ शकतो. तसेच या कायद्यात आर्थिक नुकसान भरपाई मागण्याची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. विशाल बर्गे यांनी केले.

बारामती येथील तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा २०१९बाबत मार्गदर्शन करताना ॲड. बर्गे बोलत होते. यावेळी यशश्री फाऊंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा ॲड. सुप्रिया बर्गे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य, शिक्षक, कॉमर्सचे विद्यार्थी उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ. जनार्दन पवार, अधिष्ठाता डॉ. निरंजन शहा, विभागातील सर्व प्राध्यापक आवर्जून उपस्थित होते. ॲड. बर्गे पुढे म्हणाले, जिल्हा ग्राहक मंचाकडे एक कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे अधिकार नवीन कायद्याने दिले आहेत.

पाहुण्यांचे स्वागत डॉ. मनीषा भोसले यांनी केले. आभार डॉ. विभागप्रमुख डॉ. जनार्दन पवार यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर, सचिव मिलिंद शहा यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *