प्रतिनिधी: BMTमराठी वालचंदनगर

वालचंदनगर : (ता.इंदापुर) येथे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट पालखी उत्सवा निमित्त शुक्रवार (दि. २८) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने परिसरातील भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट प्रणित, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगरच्या वतीने करण्यात आले आहे.
वालचंदनगर येथील हनुमान मंदिर येथे स्वामी समर्थांच्या पालखीचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आगमन होणार असून ५ वाजले पासून स्वामींच्या पालखीचे स्वागत व मिरवणूक हनुमान मंदीरा पासून काढण्यात येणार आहे.तर ७ वाजता स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने तेजभुषण पुरस्काराने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ८ वाजता श्रीं स्वामी समर्थांची पूजा, महाआरती व श्रींचे दर्शन व महाप्रसाद होणार असल्याचे स्वामी समर्थ सेवा मंडळा कडून सांगण्यात आले आहे.