
इंदापूर तालुका महसूल सेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी गणेश सुतार तर उपाध्यक्ष पदी सुधीर पाडुळे यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तात्या जाधव व उपाध्यक्ष गौतम गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर संघटनेची फेर निवडणूक लावण्यात आली होती.यामध्ये अध्यक्ष पदी गणेश सुतार,उपाध्यक्ष पदी सुधीर पाडुळे तर सचिव पदी राजू भादेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदरची निवडणूक प्रक्रिया संघटनेचे पूणे जिल्हा कार्यकारणी संघटक विजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष जाधव व उपाध्यक्ष गायकवाड यांनी नव्याने अध्यक्ष पदी निवड झालेल्या गणेश सुतार व उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या सुधीर पाडुळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इंदापूर महसूल सेवक संघटनेचे सुनिल झेंडे,दिलीप ठोकले, मधुकर गायकवाड, बापू लोंढे, लक्ष्मण भोसले,मिलन पवार, चंद्रकला पवार, नलिनी सूर्यवंशी, हर्षदा कांबळे, शुभांगी क्षीरसागर, कोमल बोकन, शितल पवार, स्नेहल गडकर, सागर पवार, विशाल कांबळे, आबा पवार, मिलिंद चव्हाण, मारुती वाघमोडे,दादा भोसले व इतर महसूल सेवक उपस्थित होते.