सोलापुर जिल्हा काँग्रेसला खिंडार |जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा

Spread the love

सोलापुर प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाचा‌ राजीनामा काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपल्या कार्यकर्त्यांन कडून पाठवला आहे.माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले असता धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.

धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनाम्या मध्ये सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्या कार्य पध्दतीवर निशाणा साधला असून विधानसभा निवडणुकी वेळेस उमेदवारी देताना जिल्हाध्यक्ष म्हणुन मला कोठेही विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करीत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघामध्ये काँग्रेसचे सभासद नसलेले भगीरथ भालके यांची काँगेस पक्षाकडे अधिकृत मागणी नसतानाही त्यांना तिकीट देण्यात आले ? मग कोणाच्या सांगण्यावरुन हे तिकीट देण्यात आले असा सवाल मोहिते पाटील यांनी उपस्थित केला असून सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनाम्याने काॅंग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठे भागदाड पडले असुन मोहिते पाटील यांच्या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील काॅंग्रेसचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सर्व मागण्या रास्त असून पक्षाने धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मागण्यांचा विचार करून राजीनामा स्विकारु नये काॅंग्रेस ने मोहिते पाटील यांचा राजीनामा स्विकारल्यास सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आपल्या पदाचा राजीनामा देणार असुन धवलसिंह मोहिते पाटील पुढील जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे काॅंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *