
प्रतिनिधी : पुणे
कांनींनजुकू कराटे संघटना आणि श्री गणेश व्यायाम मंडळाच्या १८ विद्यार्थ्यांनी राज्य निवड किक बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांनी एकूण २१ पदकांची कमाई केली.थाई बॉक्सिंग जिल्हास्तरीय स्पर्धेत संघाच्या ३७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या संघाने ३७ पदके जिंकत तिसरा क्रमांकाचा ‘टीम ट्रॉफी’ सन्मान पटकावला. प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उल्लेखनीय विक्रम साध्य करण्यात आला.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी श्वेता लिम, दुर्वा शिंदे,आराध्या वरांबळे,माहि चौधरी,स्वर्णब्रत घोष,विहान धावस्कर,अक्षय राजेश,निमिषा गायकवाड,रेवा आव्हाड,अनन्या जोशी,हेमनाथ पिल्लई या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.हे विद्यार्थी किक बॉक्सिंग आणि थाई बॉक्सिंग या दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. संघाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशात प्रशिक्षक प्रफुल प्रधान यांचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम महत्त्वाचे ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच संघाला उत्कृष्ट पदके जिंकता आली आणि जिल्हा व राज्यस्तरीय पातळीवर आपली चमकदार कामगिरी नोंदवता आली.