
प्रतिनिधी : बारामती (BMT मराठी)
महाराष्ट्र विधानसभेच्या २०२५ साठी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांचा विस हजार मतांनी पराभव झाला आहे !
महाराष्ट्र विधानसभेची नुकतीच निवडणूक पार पडली असुन या निवडणुकीत महायुतीला अनपेक्षीत विजय प्राप्त झाला आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असे वातावरण निर्माण झाले होते.यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांन कडून महायुतीचा सुपडा साफ होऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन करण्यात आले आहे.महाविकास आघाडीची निवडणूकीत झालेली पिछेहाट महाविकास आघाडीच्या नेत्यांन कडून मान्य केली जात नसुन त्यांच्या कडून वारंवार मतदार यंत्रा वरती शंका उपस्थित केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावा मध्ये मतदान यंत्रां विरोधात आंदोलन उभे करून काही ग्रामस्थांनी गावात मतदान पत्रिकेवर प्रति मतदान प्रक्रिया घेण्याचे ठरवले होते.मात्र पोलिस व प्रशासनाने विरोध केल्या नंतर अशा प्रकारे मतदान घेणे शक्य झाले नाही.मात्र माळशिरस आमदार उत्तमराव जानकर यांनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो असे म्हणत माळशिरस ची निवडणूक मतदान पत्रिकेवर घ्यावी असे आवाहन केले आहे.
मतदान यंत्रां मध्ये बनाव करण्यात आले असून मतदान यंत्रांचा गैरवापर वापर सत्ताधारी व प्रशासन करीत असल्याचे सांगीतले जात आहे.बारामती विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांशी छेडछाड करण्यात आली असल्याचा आरोप करीत अजित पवार हे वीस हजार मतांनी पराभूत झाले असल्याचे उत्तमराव जानकर यांनी बोलताना सांगितले.