
देवेंद्र फडणवीस असतील महाराष्ट्राचे ४१ वे मुख्यमंत्री
भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे ४१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात गटनेतेपदाची निवड करण्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे शिष्टमंडळ बनविण्यात आले होते. आज दिनांक ४ डिसेंबर रोजी शिष्टमंडळाचे प्रमुख असलेल्या विजय रुपाणी यांच्या कडून देवेंद्र फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली.देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन व विनोद तावडे यांनी फडणवीस यांच्या निवडीला अनुमोदन देत त्यांना शुभेच्छा दिल्या तर विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.