मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना
राजभवन येथे महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. त्यासोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीतील घटकपक्षांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन देणारे पत्र राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना
महायुतीच्या वतीने देण्यात आले आहे.
राजभवन येथील राज्यपालांच्या भेटीवेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार अशोक चव्हाण, खासदार रावसाहेब दानवे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच महायुतीतील सर्वच प्रमुख नेते आणि आमदार उपस्थित होते.