
महाराष्ट्रात महायुती सरकार सत्ता स्थापन करणार असुन मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार आझाद मैदानावर घेणार आहेत.महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी च्या महायुतीला बहुमत मिळाले असुन महायुती कडून सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला असुन आज दिनांक ५ डिसेंबर ला मुंबई मधील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी होणार आहे मात्र शिवसेनेच्या एकनाथ शिंदे कडून शपथ घेणार का या बाबतीत साशंकता आहे.देवेंद्र फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी मी तर शपथ घेणार असून एकनाथ शिंदे च संध्याकाळ पर्यंत समजेल असे सांगितले होते.त्यामुळे महायुती मध्ये सत्ता वाटपात अडचणी असल्याचे दिसून येत असुन गृहमंत्री पदा वरती सत्ता वाटपाची चर्चा अडुन बसल्याचे दिसून येत आहे.एकनाथ शिंदे यांच्या आमदारां कडून शिंदे यांनी सत्तेत सामील होऊन पक्ष संघटना वाढवावी असे बोलले जात आहे मात्र शिंदे स्वतः सत्तेत सहभागी होणार का आपल्या सहकाऱ्यांना सत्तेत पाठवुन रिमोट कंट्रोल ची भुमिका बजावणार कि सत्तेत सहभागी न होता सरकारला पाठिंबा देणार हे लवकरच स्पष्ट होईल.
यांच माहीत नाही मी तर शपथ घेणार…
एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या कडे पाहत मिश्कीलपणे म्हणाले यांचं माहित नाही मी तर शपथ घेणार…