
प्रतिनिधी: इंदापूर
आमदार दत्तात्रय भरणे हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले असून आमदार भरणे यांना कॅबिनेटमंत्री पदाची लाॅटरी लागली आहे.इंदापुर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्या अटीतटीच्या लढतीत भरणे यांनी बाजी मारली होती.
अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक व चेअरमन पद, पुणे जिल्हा बँकेचे संचालक, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे राज्य राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली असून आता आमदार दत्तात्रय भरणे यांची महायुतीच्या सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे.