
इंदापूर तालुक्यातील निरवांगी दगडवाडी येथील निरा नदीच्या किनाऱ्यावर असलेले पुरातन कालीन हेमाडपंती नंदकिशोराचे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून या मंदिरा बाबत अनेक आख्यायीका सांगीतल्या जातात.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात निरा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या शंभू महादेवाची यात्रा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भरते.यावेळी पुणे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र भरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. पुणे व सोलापूर जिल्ह्य़ाच्या शिवेवरच हे मंदिर असल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील भाविकांन प्रमाणाचे राजकीय नेते मंडळीचे देखील हे श्रद्धास्थान आहे.
दगडवाडी – निरवांगी येथील नंदकिशोराच्या मंदिरा बाबत अनेक आख्यायिका जुन्या जाणकारांकडून सांगीतल्या जातात.नंदकिशोराचे मंदिराच्या शिळा पाहता हे मंदिर पुरातन कालीन असल्याचे दिसून येते तर नंदकिशोराचे मंदिर स्वयंभू असून मंदिर राक्षसांनी बांधले असल्याचे देखील सांगीतले जाते या मंदिराच्या प्रवेशद्वारा वरतीच दगडा वरती मोडीलिपीत अक्षरे देखील कोरलेली आहेत तर मंदिरा समोरील नंदीचा संदर्भ शिखर शिंगणापूरशी लावला जातो.वऱ्हाडातून सात नंदी शिंगणापूर कडे चरण्यासाठी चालले होते जात असताना येथे एका नंदीला मारण्यात आल्याने तो नंदी येथेच राहिला तर बाकीचे सहा नंदी शिखर शिंगणापूर मध्ये असल्याचे देखील जाणकारांकडून सांगीतले जाते.तर काही जाणकारांच्या मत शिखर शिंगणापूर वरून काही नंदी चरण्यासाठी या ठिकाणी येत असत व पिकांची नासधूस होत असे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी या नंदीला बेदम मारहाण केली हि गोष्ट शंभु महादेवांना समजली असती स्वयम महादेव येथे आले व क्रोधित महादेवानी नंदीची हि अवस्था करणाऱ्यांना धडा शिकवणाच्या विचार केला मात्र या नंदीने मी याच धान्य खालय त्यामुळे ज्याच खालय त्यालाच शिक्षा देण उचित नसल्याच शंभु महादेवांना सांगुन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडल्याची कथा देखील सांगीतली जाते.त्यामुळेच नंदीच्या अगदी समोरच शंभु महादेवाची स्वयंभु पिंड व पादुका दिसतात.