प्रतिनिधी:BMTमराठी इंदापूर
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर पळसमंडळ बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून फेब्रुवारी महिन्यातच मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात आला असल्याने पुढील साधारण तीन ते चार महिने शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होणार आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीसाठी जीवनदायी समजली जाते मात्र सध्या नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात आधार असल्याने शेतकरी व गोपालक दुग्ध व्यवसायिक यांनी पाण्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे.यातच निरा नदीमध्ये तुरळक प्रमाणात असलेला पाण्यासाठी देखील निमसाखर पळसमंडळ बंधाऱ्यांमधुन वाहत असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात अथवा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हा पाणीसाठा संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नीरा नदी वरील बंधाऱ्यांची गळती थांबवण्यासाठी कोणाकडून तसेच पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असून देखील पाण्याची गळती होत असल्याने हा निधी पाण्यातच गेला अशी परिस्थिती निर्माण होत आहे.