
प्रतिनिधी:संजय शिंदे (BMTमराठी) इंदापूर ग्रामीण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) वतीने सन २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र शासनामध्ये महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या आदित्य सुरेश देवकाते रा मदनवाडी ता इंदापूर जि पुणे येथील रहिवासी आहे बारामती येथे शनिवारी (दि.१५) सत्कार करण्यात आला.
आदित्य देवकाते सर्व स्तरावरून कौतुक होत आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकाते वस्ती, भैरवनाथ विद्यालय भिगवन विद्या प्रतिष्ठान बारामती, ग्रॅज्युएशन बीएससी अग्रिकल्चर हे शरद कृषी महाविद्यालय जैनापुर(कोल्हापूर) येथून केले. माझी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहायक/ लिपिक टंकलेखक या पदी निवड झाली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा बारामतीमध्ये राहूनच केला आहे कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब.वडील मदनवाडी प्राथमिक सहकारी सोसायटी सचिव आहेत आई गृहिणी. माझ्या या यशात सर्वात मोठा वाटा हा आई वडिलांचा च आहे त्यांनी मला माझ्या कठीण काळात साथ दिली व अभ्यास करण्यास नेहमी प्रोत्साहित केले तसेच माझे मामा कै. किरण प्रकाश ठेंगल यांचाही माझ्या यशात वाटा आहे. त्याबरोबरच माझ्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. नीलम कोकरे मॅडम तसेच महाविद्यायात जीवनात असणारे शिक्षकवृंद यांचाही मोठा वाटा आहे.कारण लहानपणी च माझ्या शिक्षणाचा पाया या सर्वांनी भक्कम केला .मी खडतर परिस्थितीतून हे यश मिळवले आहे कारण ग्रामीण भागात असलेल्या सोयीसुविधांचा अभाव तसेच अपुरे मार्गदर्शन असूनही मला हे यश मिळाले आहे.यावेळी किसन नरुटे, बाळासाहेब देवकाते, दत्तू देवकाते, सुरेश देवकाते, महेश हुलगे आदी मान्यवर उपस्थित होते.