महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटप संपन्न

Spread the love

प्रतिनिधी:शंकर जोग (BMTमराठी) पुणे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वरद सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवेवाडी येथील दुर्गामाता गणेश मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटप कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले, या शिबिराचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले, या शिबिरामध्ये सुमारे २०० लोकांना चष्मे वाटप करण्यात आले, २५० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व १५ लोकांना मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक नवनाथ निवंगुणे यांनी केले, यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदे गट पुणे शहर सहसंपर्कप्रमुख अजय बाप्पू भोसले, शिव कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरुमकर, उपशहर प्रमुख प्रमोद प्रभुणे, पुणे शहर समन्वयक शंकर संगम, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, पुणे शहर महिला प्रमुख श्रुती नाझरीकर, पुणे शहर संपर्कप्रमुख पूजा रावतेकर, युवा सेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर, कामगार सेना प्रमुख संदीप शिंदे, विभाग प्रमुख देवेन पारखे, सदाशिव कदम, रावसाहेब तोरणे, अनिल गडकरी सर, विभाग प्रमुख नितीन लगस, निलेश जगताप, सचिन बोरगे, महेंद्र जोशी, अजिंक्य पवार, सचिन थोरात, सुरेखा पाटील, प्रणव थोरात, संदीप शिंदे, प्रशांत डाबी, आदि यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *