
प्रतिनिधी: शंकर जोग (BMTमराठी) पुणे
संत रोहिदास महाराज यांची ६४८ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची भव्य मिरवणूक शनिवार वाडा येथून लाल महल, फडके हौद, दारूवाला फुल, १५ ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौक, पुणे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मंगळवार पेठ मालधक्का चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे समारोप झाला.
या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये विविध मान्यवरांचे सत्कार समारोह करण्यात आला तसेच संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते सायंकाळी समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळ विभागीय अधिकारी अमोल शिंदे, कात्रज येथील संत रोहिदास महाराज तिसरे धामचे सुखदेव जी महाराज, उद्योजक प्रकाश पिंपळे उद्योजक नंदकिशोर सोनवणे, उद्योजक जितेंद्र चवरे, रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड, राज्य संघटक बंडू पुरुषोत्तम, पुणे शहर अध्यक्ष रोहिदास थोरात, खजिनदार सुनील राठी, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष गौरी बसेरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष लखन बेदरकर, रवींद्र शिरोळे, विजय वरछाय, चिंतामण बहिरे, आदि यावेळी उपस्थित होते.